शैक्षणिक सत्र 2023-24 करिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

शैक्षणिक सत्र 2023-24 करिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

            भंडारा,दि.14 : भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती,इमाव,विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्याथ्यांना तसेच योजनेसा पात्र असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क  योजना तसेच राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृती या योजनांचे महाडीबीटी  पोर्टल वर नविन नुतनिकरणाचे अर्ज स्विकृती 11 ऑक्टोबर,2023 पासून सुरु झालेले आहे.

            परंतु मागील वर्षाच्या तुलनेत आजतागत फक्त 54 टक्के विद्यार्थ्यांनीच शिष्यवृत्ती अर्जाकरिता नोंदणी केलेली आहे.तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अंतीम दिनाकांची वाट न बघता शिष्यवृत्ती योजनाचे अर्ज तात्काळ शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊन योजनांच्या अटी व शर्तीचे अवलोकन करुन तसेच त्यानुसार आवश्यक दस्ताऐवज अपलोड करुन अर्ज नोंदणी करावी व अर्जाची प्रत महाविद्यालयास सादर करावी.

           तसेच या योजनेच्या अधिक माहिती करिता संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्राशी संपर्ध साधावा.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,बाबासाहेब देशमुख समाज कल्याण विभागानी कळविले आहे.