विकसित राष्ट्राच्या निर्मिती करीता शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेनी घ्यावा

विकसित राष्ट्राच्या निर्मिती करीता शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेनी घ्यावा

अध्यक्षस्थानी प्रा. अतुलभाऊ देशकर,माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र.

ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी (खुर्द) येथे “अंधारलेल्या वाटा” या नाटकाचे आयोजन करण्यात आले.या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. अशोक नेते यांनी संबोधित करतांना म्हणाले, की नरेंद्र मोदी हे विविध योजनांच्या माध्यमातून देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यांचे भारताला विकसित राष्ट्र बनविणे हे स्वप्न आहे.मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली आणि योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून काँग्रेसचा हल्लाबोल व भरपूस समाचार घेतांना ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा अतुल भाऊ देशकर यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आणि म्हणाले की,त्यांना असे म्हणण्याची वेळ आली आहे की, आपल्या कार्यक्रमांना भाजपा कार्यकर्त्यांना बोलाऊ नका.भाजपाचा एवढा धसका का..ये डर बहोत अच्छा लगा..

या प्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, नागराज गेडाम माजी समाजकल्याण सभापती, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, डॉ.गोकुल बालपांडे, सौ.वंदनाताई शेंडे इ.मान्यवरांनी यावेळी संबोधित केले..

यावेळी नाटक कार्यक्रमाला भाजपा संघटन जिल्हा महामंत्री तथा माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे,माजी समाज कल्याण सभापती नागराज गेडाम, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, डॉ.गोकुल बालपांडे,सौ.वंदनाताई शेंडे,भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा.डॉ.अशोक सालोटकर, नगरसेवक मनोज भाऊ वठे, भाजपा युवा नेते साकेत भाऊ भानारकर,भाजपा युवा नेते रितेश दशमवार , प्रा.यशवंतभाऊ आंबोरकर,तनय देशकर,राजेंद्र आंबोरकर, देवराव नन्नावरे, राजेश्वर शिऊरकर, ज्ञानेश्वर दिवटे,धीरज पाल इ. मान्यवरांची उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार भास्कर तिजारे तर प्रास्ताविक सरपंच अनिल तिजारे यांनी मानले..