सैनिक कल्याण विभागाच्या जागांसाठी मुदतवाढ

सैनिक कल्याण विभागाच्या जागांसाठी मुदतवाढ

            भंडारा,दि.5: सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरीता दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. तरी लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज मागविण्याचा कालावधी दिनांक ०४ मार्च  ते २४ मार्च २०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे.तरी सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भंडारा विभागानी कळविण्यात येत आहे.