जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 

भंडारा, दि. 12 : जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे, अधीक्षक साहेबराव राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता छत्रपती बांदेकर, ओमदिप गाढवे, ईश्वरदास पडोळे, नथुसिंग पटले यांनी प्रयत्न केले.