शासन दिव्यांगाचे दारी कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी केली

शासन दिव्यांगाचे दारी कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी केली

         भंडारा, दि. 6 : येत्या 14 ऑक्टोबर रोजी  शासन  दिव्यांगांचे दारी या कार्यक्रमाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आढावा घेतला .यावेळी कार्यक्रमासाठी येणाऱ्या दिव्यांगासाठी आवश्यक त्या सोयी सुविधेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस मैदानाची पाहणी केली, यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक, लोहित मतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.