जिवेश उर्फ आतिश रमेश सोनटक्के उर्फ फ्रान्सीस ऑस्टीन रॉबर्ट यास भंडारा पोलीस प्रशासनाने केले स्थानबध्द (दिड महिण्यातील सलग तिसरी कारवाई)

एमपीडीए कायद्यान्वये जिवेश उर्फ आतिश रमेश सोनटक्के उर्फ फ्रान्सीस ऑस्टीन रॉबर्ट यास भंडारा पोलीस प्रशासनाने केले स्थानबध्द (दिड महिण्यातील सलग तिसरी कारवाई)

जिवेश उर्फ आतिश रमेश सोनटक्के, उर्फ फ्रान्सीस ऑस्टीन रॉबर्ट वय 25 वर्ष, रा. वॉक्स कुलर कंपनीच्या मागे शिवकृष्णधाम कोराडी रोड नागपुर, ह.मु. कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन भंडारा परीसरातील कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. जिवेश उर्फ आतीश सोनटक्के हा सन 2019 पासुन निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस ठाणे भंडारा, कोराडी जिल्हा नागपुर येथे दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी कर्मचारी हमला, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे 9 गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये धोकादायक व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.

अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात जिवेश उर्फ आतिश रमेश सोनटक्के, वय 25 वर्ष, रा. कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन भंडारा परीसरातील कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा (महाराष्ट्र) याचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास दिनांक 20/10/2023 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन भंडारा कारागृहात दाखल करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा धोकादायक व्यक्तींचा गुन्हे अभिलेख तपासुन एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.) नितीनकुमार चिंचोळकर, पोलीस निरीक्षक, भंडारा श्री. गोकुल सुर्यवंशी, पोउपनी. अनंता गारमोडे पो. हवा.राजेश पंचबुध्दे, पो.ना. अंकोश पुराम, पो.हवा क्रिष्णा बोरकर, पो.हवा बाला वरकडे, पो.हवा. साजन वाघमारे, पो.ना. अजय कुकडे, पो.ना. सुनिल राठोड, पो.शि.नरेंद्र झलके, पो.शि. राजेद्र लाबंट यांनी केली.