शिक्षक मतदारसंघ निवडणूककरिता जिल्ह्यात माध्यम सनियंण समिती गठीत

शिक्षक मतदारसंघ निवडणूककरिता जिल्ह्यात माध्यम सनियंण समिती गठीत

 

भंडारा, दि. 12 : भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात पेडन्युजची छाननी तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम इत्यादी माध्यमातील जाहिरात प्रमाणीकरणासाठी माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण जिल्हा स्तरीय समिती (Media Certification and Motoring Committee) (MCMC) गठित करण्यात आली आहे.

या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर राहातील तर समितीचे सदस्य म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, पोलीस निरीक्षक सायबर सेल, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंडे व सदस्य सचिव म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ राहातील.

ही समिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत म्हणजेच दिनांक 04 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यरत राहणार आहे.