विधानसभा मतदारसंघ न्याय ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाटप

विधानसभा मतदारसंघ न्याय ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाटप

             भंडारा,दि.२१ :दिनांक १९ मार्च रोजी ११- भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघांतर्गत भंडारा जिल्ह्याच्या ईव्हीएमचे प्रथम रँडमायझेशन ( सरमिसळ ) करण्यात आले. सदर रँडमायझेशन करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी, 11 भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघ तसेच जिल्हा अधिकारी भंडारा शयोगेश कुंभेजकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांना प्रथम सरमिसळ किंवा  प्रथम रँडमायझेशनची माहिती दिली .

          त्यानंतर सदर रँडमायझेशन राजकीय पक्षांच्या समक्ष करण्यात आले आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम्स 138%  BU 138% CU आणि 148 % V V Pad  याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला निश्चित झाल्या. सदर  विधानसभा मतदार  संघ निहाय निश्चित झालेल्या ईव्हीएम ची यादी सर्व राजकीय पक्षांना समक्ष वाटप करण्यात आले. सर्वाचे आभार मानून सदर प्रथम रँडमायझेशन प्रक्रिया संपल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कुंभेजकर यांनी जाहीर केले.

६० _तुमसर विधानसभा मतदार विभागनिहाय बी यु -480, सी यू 480 आणि व्हीव्हीपॅट ५१५

६१ भंडारा बी यू  ५९७ , सि  यू ५९७ व्हीव्हीपॅट ४६०

६२ साकोली बी यु ५१७, सी यु ५१७ आणि व्हीव्हीपॅट ५५५

                 जिल्ह्यात एकूण 1594 बीयू 1594 सी यु आणि 1710 व्हीव्हीपॅट आहेत.दिनांक 19 मार्च रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रथम सरमिसळ करण्यात आली त्यानंतर जिल्हा मुख्यालयातील स्ट्रॉंग रूम मधून दिनांक 20 मार्च रोजी काढून तुमसर भंडारा साकोली विधानसभा मतदारसंघांना वाटप करण्यात आले तसेच शासकीय धान्य गोदाम साकोली येथून जिल्हास्तरीय ईव्हीएम सुरक्षा कक्षातून वरील प्रमाणे युनिटचे वाटप करण्यात आलेले आहे.