सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी सुरू Ø पाच खरेदी केंद्र कार्यान्वित

सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी सुरू Ø पाच खरेदी केंद्र कार्यान्वित

चंद्रपूर, दि. 15 : नाफेडमार्फत आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2022-23 मध्ये सोयाबीन खरेदी करिता शेतकऱ्यांची नोंदणी तसेच पाच केंद्रावरून खरेदी सुरू करण्यात आली आहे.

सोयाबीन खरेदीसाठी चंद्रपूर, राजुरा, चिमुर, गडचांदूर व वरोरा येथे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही, अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरेदीची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील खरेदी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये चंद्रपूर खरेदी केंद्रास पोंभुर्णा व सावली तालुका, राजुरा खरेदी केंद्राला बल्लारपूर, गोंडपिपरी व मुल तालुका, चिमूर खरेदी केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड तालुका, गडचांदूर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती तालुका तसेच वरोरा खरेदी केंद्राला भद्रावती तालुका शेतकरी नोंदणी व खरेदीसाठी जोडण्यात आले आहे.

दिलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आपले ई-सातबारा, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आठ-अ प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवज आवश्यक असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.