कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रम

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण
अधिनियम 2005 अंतर्गत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रम

गडचिरोली, दि.28 : कुटुंबात व समाजात महिलांचे अधिकार व हक्क अबाधित रहावे तसेच स्त्रियांना होणा-या विविध हिंसेपासुन संरक्षण मिळावे यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंमलात आहे. सदर अधिनियमाची व्यापक प्रमाणात जनमानसात प्रचार प्रसिध्दी व्हावी या करीता दिनांक 28 फेब्रुवारी 2024 ला पंचायत समिती सभागृह, कुरखेडा येथे 11.00 वाजता कौंटुबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अधिक माहिती करीता संरक्षण अधिकारी, कुरखेडा स्थित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (पंचायत समिती परिसर) कुरखेडा यांचेशी संपर्क साधावे. असे संरक्षण अधिकारी, कुरखेडा यांनी कळविले आहे.