युनिफॉर्म सिविल कोड ला…. आदिवासी विकास परिषदेचा विरोध 

युनिफॉर्म सिविल कोड ला…. आदिवासी विकास परिषदेचा विरोध 

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर म रा वतीने मा. अध्यक्ष/ सचिव ला कमिशन ऑफ इंडिया चौथा मजला लोकनायक भवन न्यू दिल्ली भारत सरकार. यांना शिंदेवाही तहसीलदार कार्यालय जिल्हा चंद्रपूर म रा मार्फत निवेदन सादर करण्यात आले. समान नागरिक संहिता व नियम झाल्यास. आदिवासी समाजाचे अलगओळख आहे ती नष्ट होण्याची शक्यता आहे. आम्ही मूलनिवासी अलग असून सामाजिक सांस्कृतिक रिती रिवाज परंपरा रूढी रिवाज प्रथा संस्कृती धार्मिक विधी. सामाजिक आन-बान शान नष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातून सदर कायद्याला लागू होऊ नये याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने विरोध दर्शविला आहे. आदिवासी लोक सिंधू संस्कृतीचे प्रथम वारसदार आहेत या देशाचे मूलनिवासी असून देशाचे मूलमालक आहेत. देशात आदिवासी अनुसूचित जमाती मधील रूढीपरंपरेनुसार नियंत्रित नियंत्रित केले जातात. सविधान अनुच्छेद तेरा पब्लिक तीन क 372 नुसार या रूढी परंपरेला कायद्याचे संरक्षण असल्याने समान नागरिक कायदा आदिवासीसाठी लागू केला तर घटनेतील घटनास्थमत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर निवेदनाकरिता कैलास कुमरे जिल्हा संपर्कप्रमुख अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद. विजय सोयाम तालुकाध्यक्ष से नी तहसीलदार. वसंत शिडाम कार्याध्यक्ष ता. पोलीस जमादार. लोकेश मडावी ता सचिव. जीवनदासजी गेडाम सामाजिक कार्यकर्ते. राकेश भाऊ अलोने सामाजिक कार्यकर्ते शिंदेवाही. रमेश शिडाम वार्ताहर लोकमत मोहाडी. कृष्णा मडावी उपाध्यक्ष आदिवासी विकास परिषद. विठ्ठल मसराम बालकृष्ण गेडाम वनपाल से.नी. हे अन्य आदिवासी बांधव निवेदनाकरिता तहसील कार्यालयात उपस्थित होते.