पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे रुग्णालयात भरती किडनीची समस्या उद्भवल्यामुळे नागपुरात उपचार सुरु

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे रुग्णालयात भरती
किडनीची समस्या उद्भवल्यामुळे नागपुरात उपचार सुरु
पीरिपाचे राज्यातील सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित
 

नागपूर: लॉंगमार्च प्रणेता, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार. प्रा. जोगेंद्र कवाडे सर हे 7 मार्च रोजी नाशिक येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 1 दिवसीय दौऱ्यावर गेले होते. परंतु, कवाडे सरांना प्रकृतीत अस्वस्था जाणून आल्यानंतर लगेच नाशिक येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले. किडनीची समस्या उद्भवल्यामुळे तसेच प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपुरातील रामदासपेठ स्थित सुप्रसिद्ध डॉ. सुहास कानफाडे रूग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
जयदीप कवाडे यांनी सांगितले की, 8 मार्चपासून त्यांच्यावर डाॅ. कानफाडे हाॅस्पिटलमध्ये योग्य उपचार सुरू आहे. त्याचप्रमाणे डॉ. सुहास कानफाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची एक चमू प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्यावर विशेष लक्ष देत आहे. त्यांना पुढील 15 दिवस विश्रांतीचा सल्ला डाॅक्टरांनी दिला असल्यामुळे येत्या 19 मार्चपर्यंतचे राज्यातील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आले, असल्याचेही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.