पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली, दि.14: जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर,गडचिरोली, आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली,यांच्या संयुक्त विद्यमाने दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली, येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

 

सदर रोजगार मेळाव्यामध्ये स्थानिक कंपनी उपस्थित असणार असून सदर रोजगार मेळाव्याकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली, चामोर्शी,आरमोरी,ईच्छुक येथील उत्तीर्ण असलेल्या ईच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा,शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स सह स्वखर्चाने दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली,येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली, यांनी केले आहे.अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. दुरध्वनी क्रंमाक 07132-222368.आहे.