लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे जागतिक योग दिन संपन्न

लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे जागतिक योग दिन संपन्न

बातमी संकलन – प्रकाश देवारकर

लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सिंह तर उदघाटक लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील हे होते.तसेच कार्यवाह मा.श्रीकृष्ण घड्याळपाटिल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रिय सेवा यो.च्या कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री शास्त्री यांनी केले तर आभार डॉ.दीपक लोणकर यांनी व्यक्त केले.योग दिनानिमित्त विविध आसने आणि उपक्रम क्रिडासन्चालक प्रा. उत्तम देऊळकर यांनी घेतले.या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी भौतिक नियमांचे पालन करून सहभागी झाले.