पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौर

  • पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौर

चंद्रपूर, दि. 16 मार्च : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे, कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता नियोजन भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.