जलजागृती  सप्ताहात 16 ते 22 मार्च दरम्यान होणार विविध उपक्रम

जलजागृती  सप्ताहात 16 ते 22 मार्च दरम्यान होणार विविध उपक्रम

       भंडारा, दि.15 :जलसंपदा विभागातर्फे दरवर्षी जलजागृती सत्ता निमित्त विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील 16 ते 22 या सप्ताह दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी

          16 मार्च, रोजी सकाळी 10 वाजता वैनगंगा नदीघाट जुना पुल महादेव मंदिराजवळ जलपूजनाची रॅली शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,तसेच अधिक्षक अभिंयता यांच्या हस्ते होणार आहे.तसेच वैनगंगा नदीघाट ते खामतलाव शितला माता मंदिर जवळ समारोप मोटार सायकल रॅली निघणार आहे.

        तसेच 17 ते 19 मार्च, रोजी सकाळी 10 वाजता ते सांयकाळी 6 वाजेपर्यत भंडारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील पुर्ण झालेल्या व बांधकामाधिन प्रकल्पांचे लाभक्षेत्रातील गावे व त्यांनतर प्रभात फेरी पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी मेळावा चित्रकला स्पर्धा प्रबोधन पथनाटय व जलप्रतिज्ञा पाणीपट्टी वसुली प्रबोधन तसेच सर्व संबंधित कार्यकारी अभियंता,स.अ.श्रे.1 यांच्या हस्ते होणार आहे.

          त्यानंतर 20 मार्च,2024 रोजी दुपारी 1 वाजता शेळी उपसा सिंचन योजना व शेतकरी संवाद कार्यकारी अभियंता,अविल बोरकर यांचे हस्ते होणार आहे. यानंतर 21 मार्च,2021 रोजी सकाळी  11 वाजता जे.एम.पटेल महाविद्यालय,भंडारा येथे  दुपारी 3 ते 5 पर्यत स्थळ :- नेरला उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रातंर्गत कार्यक्रम पाणी वापर संस्था इमारत हस्तांतरण, कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उपसा सिंचन विभाग आंबाडी यांच्या हस्ते व होणार आहे.

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी

      त्यानंतर 22 मार्च,2024 सकाळी 11 वाजता स्थळ :- सर्व शासकीय कार्यालये तसेच शाळा, कार्यक्रम जलप्रतिज्ञा, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांचे हस्ते होणार आहे.यानंतर सकाळी 11.15 ते दुपारी 1 वाजेपर्यत स्थळ :- आंबाडी वसाहत सभागृह, अधिक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ आंबाडी भंडारा यांच्या हस्ते समारोप होणार आहे.असे आवाहन उपकार्यकारी अभियंता गोसीखुर्द उपसा सचिंन विभाग आंबाडी भंडारा या विभागानी कळविले आहे.