प्रशांत गायकवाड यांनी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये – संतोषभाऊ रडके

प्रशांत गायकवाड यांनी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये – संतोषभाऊ रडके

बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे नेतृत्वात क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचा वाढता जनसंपर्क व भाजपा कार्यकर्ते मार्फत पक्षबांधणी बघता अनेक पक्षातील विरोधक हे भाजपाला बदनाम करण्याचे प्रयत्न करीत आहेत परंतु आमदार साहेबांनी क्षेत्रात केलेले विकासकामे व गरीब जनतेची मदत व सेवाकार्य सतत भाजपा पदाधिकारी मार्फत सुरू असल्याने विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांवर जनता ही विश्वास करीत नाही.त्यामुळे नुकताच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाचे मार्फत व्हाट्सएपच्या माध्यमातून एक खोटी बातमी लागलेली आहे की, नागभीड तालुक्यातील प्रशांत दादाजी गायकवाड हे तळोधी (बा) येथील भाजपा युवा मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.परंतु प्रशांत उर्फ गोलू गायकवाड याला पक्ष विरोधात काम करत असल्याने गेल्या मागील 1 वर्षा पूर्वीच त्याला भाजपा मधून काढण्यात आलेले होते व त्याच्याकडे भाजपा मध्ये असतांना सुद्धा कोणताही पद दिल्या गेलेला नव्हता जर प्रशांत गायकवाड यांच्या दाव्याप्रमाणे पद दिल्या गेले होते तर त्यांनी तसे सबळ पुरावे सहित जनते समोर सादर करावे.प्रशांत उर्फ गोलू गायकवाड हा भाजपा मधून मागील 1 वर्षापूर्वी गेला तेव्हा पासूनच त्याने काँग्रेस पक्षामध्ये आपले कार्य सुरू केले होते.फेसबुक व व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेक व्हाट्सएप ग्रुपवर तो काँग्रेसचे कार्यक्रमाची माहिती तसेच त्याचे स्वतःचे काँग्रेस पक्षाचे लोगो असलेले ग्राफिक्स वापरून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना शुभेच्छा द्यायचा व आजही देत आहे प्रशांत गायकवाड यांनी जनतेची तसेच ज्या राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा त्याने दिशाभूल ही केलेली आहे की तो भाजपचा पदाधिकारी होता हे त्याचे बोलणे संपूर्ण खोटे आहे.असे आज भाजपा तालुक्याचे आढावा बैठकीत संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड यांनी स्पष्ट केले आहे.