जिल्हाधिकाऱ्यांनी युक्रेनवरून प्रितीशची घेतली भेट

जिल्हाधिकाऱ्यांनी युक्रेनवरून प्रितीशची घेतली भेट

भंडारा दि.7 : युक्रेनवरून सुखरूप परतलेल्या प्रितेश पात्रे यांची जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

रशिया-युक्रेन युध्दामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रितेशचे भंडाऱ्यात आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.