जिल्हा पुर्णपणे क्षयमुक्त करण्यासाठी सामुहीक योगदान आवश्यक – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

जिल्हा पुर्णपणे क्षयमुक्त करण्यासाठी सामुहीक योगदान आवश्यक – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

 

· प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान आढावा

 

भंडारा, दि. 29 : जिल्हा व शहर क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची आवश्यकता असुन यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी नागपूर येथे केले. दिनांक 22 डिसेंबर रोजी राजभवन येथे आयोजित नागपुर मंडळा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी यांचेकडुन प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाचा आढावा राज्यपाल कोश्यारी यांनी घेतला.

 

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री संजय खंडारे, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपुर विभाग नागपुर डॉ. विनीता जैन यांचेसह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. क्षयरुग्णांना पोषण आहार, व्यावसायिक प्रशिक्षण इत्यादी साहाय्य निक्षय मित्रांच्या माध्यमातुन देण्याचे प्रयोजन आहे.

 

जिल्हयातील स्वंयसेवी संस्था, राजकीय पक्ष, निवडून आलेले जनप्रतिनिधी व शासन अधिनस्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी 1 ते 2 क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांना पोषण आहाराची उपचार कालावधीत पुर्तता केली तर क्षयरुग्णांना पोषण आहार मिळेल. जिल्हयात 311 निक्षय मित्रांची नोंदणी झालेली आहे. यातील 285 व्यक्तींनी क्षयरुग्णांना सहकार्य कलेले आहे.

 

भंडारा जिल्हयात सद्यस्थितीमध्ये क्षयरोगाचे 1206 रुग्ण असुन त्यांना निक्षय मित्रांची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांची सहमती असणे गरजेचे आहे. जिल्हयात 285 क्षयरुग्णांना पोषण कीट वितरीत करण्यात आल्या असून निक्षय मित्रांनी 285 पेक्षा जास्त क्षयरुग्णांना पोषण कीट वितरीत केल्या आहेत.

 

क्षयरुग्णांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे दृष्टीने पोषण आहार अत्यंत महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिव्यक्ती प्रतिमहीना आवश्यक धान्य, कडधान्ये, डाळी, तेल इत्यादी सामुग्री क्षयरुग्णांना पुरविल्यास हा रोग बरा होऊ शकतो, पर्यायाने इतरांना क्षयरोग संक्रमित होण्याचा धोका कमी होऊन क्षयरोग मुक्त भारत ही संकल्पना साध्य करू शकतो.