अरूननगर व गौरनगर येथे नवदुर्गा महाकाल्याचे आयोजन

संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

नवेगावबांध दि.27ऑक्टोबर:-
दुर्गा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अरूननगर व गौरनगर येथे नवदुर्गा महाकाला निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे यांनी आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी मंगळवारला भेट दिली. यावेळी अरुणनगर ,गौरनगर येथील ग्रामवासीयांसाय अडीअडचणी आमदार महोदयांनी ऐकून घेऊन त्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी बाबुलजी बनिक, बिरनजी सरकार,दिलीपजी मंडल, बलरामजी बादलदास, हिरामणजी मंडल, मनातोसजी साना, संजीतजी बिश्वास,भुदेव पाईक, उदय सरकार इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.