जिल्हास्तरीय कर्ज मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय कर्ज मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

भंडारा, दि. 27 : सणासुदीच्या काळात कर्ज पुरवठा वाढविण्याकरिता व कर्ज योजनांची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी (Credit Outreach Campaign) ऋण प्रचार, प्रसार करण्यासाठी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक यांचे कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कर्ज मेळाव्याचे आयोजन 29 व 30 ऑक्टोबर 2021 रोजी लक्ष्मी सभागृह, जे. एम. पटेल कॉलेज रोड, भंडारा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय कर्ज मेळाव्यात इच्छुक नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक अशोक कुंभलवार यांनी केले आहे.
कर्ज मेळाव्यामध्ये बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बॅंक, इंडियन ओवरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, युनियन बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा एकूण 16 बँक सहभागी होणार असून त्यांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलच्या माध्यमातून शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना, मध्यम व सूक्ष्म लघु उद्योग, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टँड अप इंडिया, गृह कर्ज योजना, वाहन कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेंशन योजना इत्यादी योजनेसंबंधी माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येणार येईल व इच्छुक आणि पात्र कर्जदाराचे कागदपत्र घेऊन प्रस्ताव तयार करण्यात येतील. शासकीय कर्जावर व्याजदर साधारणत: 7 ते 12 टक्के असून ते कर्ज मर्यादेवर आधारित असते, असे जिल्हा अग्रणी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.