शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीसाठी 23 मार्च अंतीम मुदत

शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीसाठी 23 मार्च अंतीम मुदत
गडचिरोली, दि.14: भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नवीन व प्रलंबित अर्ज महाडिबीटी पोर्टलवर सादर करण्याची अंतिम मुदत 23 मार्च 2024 देण्यात आली आहे.
जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगर व्यावसायीक, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयानी सन 2022-23 व 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, इतर मागाव वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन मंजूरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाकडे सादर करावे. महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नविन अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 23 मार्च, 2024 ही शेवटची संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालक वर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी केले आहे.