भारतीय गोरक्षण गोशाळा संस्था तळोधी (बाळापुर) येथे गोनिवासाचे भूमिपूजन सोहळा संपन्न….

भारतीय गोरक्षण गोशाळा संस्था तळोधी (बाळापुर) येथे गोनिवासाचे भूमिपूजन सोहळा संपन्न….

खासदार अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती..

नागभीड:-भारतीय गोरक्षण गोशाळा संस्थेद्वारा संचालित तळोधी (बाळापुर) ता.नागभीड जि.चंद्रपूर येथे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोनिवास शेडचे भूमिपूजन सोहळा दिनांक १९ डिसेंबरला विदर्भ प्रांत संघचालक दीपकराव तामशेट्टीवर यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई गो-आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते,तसेच खासदार अशोक नेते,माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

यावेळी जयंत खरवडे,ब्रम्हपुरी/ चंद्रपूर विभाग संघचालक रा. स्व. संघ, सुनिलजी मानसिंहका, सदस्य भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड भारत सरकार, सुनिलजी सूर्यवंशी, सदस्य महाराष्ट्र शासन गोसेवा आयोग, सनत गुप्ता, सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग, प्रशांत तितरे, विदर्भ प्रदेश मंत्री विश्च हिदू परिषद, नागपूर यांच्यासह डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, चंद्रपूर, उमेश हिरुडकर, जिल्हा पशुसंरक्षक अधिकारी चंद्रपूर,साकेत भानारकर,आदी मान्यवर व मोठ्या संख्येने गावकरी नागरिकांनी सहभागी होऊन प्रामुख्याने उपस्थित होते.