हवेली गार्डन व राजनूर रेसिडेन्सी परिसरात खुल्या जागेत विकासकामे व सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

हवेली गार्डन व राजनूर रेसिडेन्सी परिसरात खुल्या जागेत विकासकामे व सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

चंद्रपूर/ प्रतिनिधी
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर च्या वतीने वडगाव प्रभाग क्रमांक 8मध्ये ओमकारनगर हवेली गार्डन परिसरातील हनुमान मंदिराजवळ व राजनूर 
रेसिडेन्सी परिसरात खुल्या जागेत विकासकामे व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

या विकासकामासाठी बुधवार, ता. २७ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन समारंभ महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सभागृह नेता तथा प्रभाग नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक प्रदीप देशमुख यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. खुल्या जागेत खुली जिम, लहान मुलांसाठी खेळणी, हायमास्ट लाइट, वॉकिंग ट्रक आदी विकासकामे व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात श्री. देशपांडे, श्री मेश्राम, श्री सुरेश अङपेवार, श्री भगत, सौ. ङुकरे, राजू कक्कङ, श्री. मांदाङे, श्री. मिश्रा, सुनील चोपडे, श्री. वर्मा, श्री. शर्मा, रमेश वांढरे, दिलीप कार्लेवार, श्री. धुर्वे, श्री. भट्ट, श्री. सूर्यवंशी, श्री. संतोष वैद्य, सौ. सोनुङुले, शुक्ला, मुळेवार यांची उपस्थिती होती.