आदर्श गाव-हिरापूर आणि जांभुळ महोत्सव २०२३ कार्यक्रमाचे आयोजन

आदर्श गाव-हिरापूर आणि जांभुळ महोत्सव २०२३ कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली, दि.16: मा. कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या संकल्पनेतून आदर्श गाव कार्यक्रमाचे आयोजन मौजा हिरापुर ता. जि. गडचिरोली येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळ पिकाखालील लागवडीचे क्षेत्र वाढ होण्याच्या दृष्टीने आणि जांभळाचे मुल्यवर्धित पदार्थांना चालना देण्याकरीता जांभुळ महोत्सव – २०२३ तसेच खरीप हंगामपूर्व मेळावा आणि पीडीकेव्ही विक्री केंद्र व व कृषि औजारे बँक उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ जुन २०२३ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील मा. कुलगुरू, डॉ. शरद गडाख, मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. धनराज उंदीरवाडे, मा. धनाजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी, गडचिरोली, डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक, वनविभाग, गडचिरोली, मा. नारायण पवनीकर, जिल्हा विकास व्यवस्थापक (नाबार्ड), गडचिरोली तसेच विविध कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम मौजा हिरापूर येथे आदर्श गाव कार्यक्रमाचे घेण्यात येईल. त्यानंतर जांभुळ महोत्सव – २०२३ व खरीप हंगामपुर्व मेळाव्या दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच पीडीकेव्ही विक्री केंद्र व कृषि औजारे बॅक उद्घटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जांभुळ महोत्सवादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळ चे प्रकार, मुल्यवर्धित पदार्थांचे दालन तसेच तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचा शेतकरी बंधु-भगिनी, विद्यार्थी तसेच पालकांनी उत्स्फर्त लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोलीच्या वतीने करण्यात येत आहे.