स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम साजरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

स्वच्छता अभियान कार्यक्रम साजरा

भंडारा, दि. 27 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व नगर परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर कार्यक्रम 1 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत असून जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत व युवा मंडळ यांचा सहभाग असणार आहे, असे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी कळविले आहे.