अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे पडोली पोलिस स्टेशनचे आवाहन

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे

पडोली पोलिस स्टेशनचे आवाहन

चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : पोलिस स्टेशन पडोली हद्दीत दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी आमटा वार्ड, पडोली येथील रेल्वे पटरी लगतच्या झाडाला एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष, गळफास लागून मृत अवस्थेत आढळून आला असून त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास पोलीस स्टेशन, पडोली मार्फत करण्यात येत आहे.
सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 40 वर्षे आहे. वर्ण सावळा, उंची 5 फुट 2 इंच, सडपातळ बांधा व उजव्या हातावर नंदू मेश्राम असे नाव लिहिले आहे. सदर वर्णनाच्या मृतक व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशन, पडोली येथील पोलीस निरीक्षक एम. व्ही. कोंडावार 9158998564, सहाय्यक फौजदार पवन कुळसंगे 9421731575  अथवा 07172-287488 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस स्टेशन पडोली मार्फत करण्यात आले आहे.