रोहयो समितीकडून दोन दिवसांत 13 तालुक्यांचा दौरा Ø विविध कामांची केली पाहणी

रोहयो समितीकडून दोन दिवसांत 13 तालुक्यांचा दौरा

Ø विविध कामांची केली पाहणी

चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीने दुस-या दिवशी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गावांना भेटी देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली. गुरुवारी समितीच्या विविध टिमने पाच तालुक्यातील 21 गावांना भेटी दिल्या होत्या.
सिंदेवाही तालुक्यातील काही कामांमध्ये तृट्या आढळून आले आहेत त्या कामात जे अधिकारी जिम्मेदार असतिल त्यांचेवर कार्यवाही होणार आहे.
सदर समितीने शुक्रवारी चिमूर तालुक्यातील मासळ (बु), मदनापूर, कोलारा, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी, गडबोरी, रामाळा, नागभीड तालुक्यातील गिरगाव, मिंडाळा, ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळगाव, गोंडपिंपरी तालुक्यातील कन्हाळगाव (गणपूर), चेक व्यंकटपूर, वढोली, गणेशपिंपरी, पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा, बोर्डा बोरकर याशिवाय सावली आणि मूल तालुक्यातील गावांनासुध्दा भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यांनी रोपवाटिका, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, वृक्षलागवड, बोडी खोलीकरण, अभिसरण, शोष खड्डे, गट लागवड, घरकुल, रस्ता दुतर्फा, स्मशानभुमी शेड बांधकाम आदी कामांची पाहणी केली.
जिल्ह्यात दाखल झालेल्या समितीमध्ये समितीप्रमुख आमदार सर्वश्री मनोहर चंद्रीकापुरे यांच्यासह राजेश पाटील, नरेंद्र दराडे, अमोल मिटकरी, दादाराव केचे, रामदास आंबटकर, विक्रमसिंह सावंत, शिरीष चौधरी, समीर कुणावार, दिलीप बोरसे, राजेश राठोड आदींचा समावेश आहे.