जिल्हाधिका-यांनी केली बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी

जिल्हाधिका-यांनी केली बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी

चंद्रपूर, दि. 27 : चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राला (बीआरटीसी) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विजय पवार, बी.आर.टी.सी. चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी.मल्लेलवार, नायब तसीलदार श्री. खंडाळे, वनपाल श्री. कोसनकर, तलाठी श्री. आत्राम तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी प्रकल्प परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामागर्फत चालू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या विविध बांबू इमारती, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेले अल्पमुदत आणि दीर्घमुदत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम, बांबू सेटम येथे लावलेल्या विविध बांबू प्रजाती, बांबू प्रक्रिया प्रकल्प इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली. येथे सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करून सदर प्रकल्प बी.आर.टी.सी. यांना हस्तांतरीत करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले.

तसेच आगीच्या दृष्टिने धोकादायक असणारे स्थळ जसे विद्युत विभाग परिसर, हनुमान मंदिर परिसर याबाबत जिल्हाधिका-यांना माहिती देण्यात आली. प्रकरणी जागा पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी तहसीलदार विजय पवार यांना दिले.