चंद्रपूर : असोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत कालव्यांच्या वितरण प्रणालीचे नूतनीकरण

असोलामेंढा प्रकल्पाअंतर्गत कालव्यांच्या वितरण प्रणालीचे नूतनीकरण

चंद्रपूर दि. 10 ऑगस्ट : सद्यस्थितीत आसोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण अंतर्गत कालव्याच्या वितरण प्रणालीच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. सदर वितरण प्रणालीची कामे अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यामुळे कालव्याच्या उतारावर भेगा पडल्या आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी जंगलातील पाणी कालव्यात येत आहे. यासाठी या ठिकाणी बांधकाम प्रस्तावित असून पुढील हंगामात त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर जंगलातील पावसाचे पाणी कालव्यात येणार नाही व कालव्याला क्षती पोहोचणार नाही. सदर कालवे पूर्ण खोदाईतील असल्यामुळे कालवा फुटणार नाही. यासाठी विभागामार्फत विशेष काळजी घेण्यात येत आहे.
शेतकरी बांधवांना चालू खरीप हंगामात हमखास पाणी मिळेल,याबाबत शंका बाळगू नये, असे असोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.