चंद्रपूर : मूलनिवासी आदिवासी महासभा युवा विंग्ज च्या माध्यमातून पेन पूजा व सामाजिक चर्चा आयोजित करण्यात आली

मूलनिवासी आदिवासी महासभा युवा विंग्ज च्या माध्यमातून पेन पूजा व सामाजिक चर्चा आयोजित करण्यात आली

सर्व जगात 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस या नावाने साजरा केल्या जातो.त्या निमित्ताने मूलनिवासी आदिवासी महासभा युवा विंग्ज च्या माध्यमातून पेन पूजा व सामाजिक चर्चा आयोजित करण्यात आली होती .त्यात आदिवासी माना समाजाची संस्कृती,संविधानातील हक्क आणि अधिकार,वर्तमान परिस्थिती,भविष्यातील चिंतन आणि आव्हाने,संघटन बांधणी व तरुणांची जबाबदारी या विषयी चर्चा करण्यात आली.
या मध्ये प्रेरणादायी वीरांगना मुगदाई सेवा ट्रस्ट, डोमा (पेरजागड परिसर) चे अध्यक्ष-  प्रा .रामराव ननावरे सर ,सचिव-  पुरुषोत्तम रंदये सर आणि सर्व सदस्य तसेच आदिवासी महासभा चे गुरुदेव ननावरे ,नंदू आत्राम, मानकीमुंडा शंकर चौखे , कार्तिक शेंडे, राहुल दडमल, दिवाकर नागवंशी, मधू दोडके , राकेश घरत, शशी मगरे, ईश्वर भरडे , नितेश गायकवाड , अविनाश आत्राम यांच्या उपस्थितीत सकाळी पेन पूजा, आदिवासी पारंपारिक मांदळ नृत्य, आदिवासी महापुरुषांचा जयघोष प्रसिद्ध पेरजागड इथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला..
जागतिक आदिवासी दिनानिमित्याने आदिवासी महासभेने समाजाला एक संदेश दिला आहे
एक तिर एक कमान , सब आदिवासी एक समान
सारे भारत के आदिवासी एक हो..