बेवारस महिला रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा

बेवारस महिला रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा

चंद्रपूर, दि. 10 ऑगस्ट : 1 ऑगस्ट 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील वार्ड नं.  17 मध्ये एक अनोळखी,40 वर्षीय बेवारस महिला रुग्णाला भरती करण्यात आले आहे. सदर महिला रुग्णाचा नोंदणी क्रमांक 24820 व एमएलसी क्रमांक 7918 असून सदर महिला रुग्णासोबत कोणीही नातेवाईक तथा परिचित व्यक्ती नाही.
 तरी, संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी तथा परिचित असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील वार्ड नं. 17 मध्ये संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे.