युपीएससी मुख्य  परिक्षेस पात्र विदयार्थ्यांना 50 हजाराचे अर्थसहाय

युपीएससी मुख्य  परिक्षेस पात्र विदयार्थ्यांना 50 हजाराचे अर्थसहाय

          भंडारा दि .27: महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती,नागपूर मार्फत सन 2023 या वर्षासाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक 50 हजार एक रकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यासाठी 29 मे.2023 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला होता.

        तसेच 12 जून 2023 पासून UPSC पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला होता.त्यानुसार महाज्योती मार्फत इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील UPSC पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी 50 हजार रुपयाची सहाय्य करण्याकरिता 16 जून 2023 ते 8 जुलै 2023 पर्यत अर्ज मागविण्यात आलेले होते.

        या योजनेचा लाभ घेण्यासाठी 356 अर्ज प्राप्त झालेले होते.त्यापैकी,314 विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहे.त्यातील 298 विद्यार्थ्यांना 50 हजार एक रकमी अर्थसहाय्य त्यांच्या बॅक खात्यात जमा केलेले आहे.तरी महाज्योतीने आतापर्यत  1 लाख 49 हजार रुपये इतक्या निधीचे विद्यार्थ्यांना वितरण केलेले असून उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बॅक तपशील सादर केल्यावर त्यांना 7,00,000/-रुपयाची निधी वितरीत करण्यात येईल.

         युपीएससी मुख्य परीक्षा ही 15 सप्टेंबर 2023 पासून होणार आहे. महाज्योतीच्या उमेदवारांना वितरीत केलेल्या अर्थसहाय्याचा या परीक्षेच्या तयारीसाठी लाभ होणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थेनी कळविले आहे.