गडचिरोली : लोकहिताचे कार्य हीच शिवसेनेची ओळख जिल्हा प्रमुख रियाज शेख यांचे मार्गदर्शन

लोकहिताचे कार्य हीच शिवसेनेची ओळख

जिल्हा प्रमुख रियाज शेख यांचे मार्गदर्शन

सिरोंचात शिवसेना पक्षाचे मार्गदर्शन शिबीर

सदाशिव माकडे
(गडचिरोली जिल्हा)

सिरोंचा :- लोकहिताचे कार्य हेच शिवसेनेची ओळख असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी व्यक्त केले.
ते रविवार २५ जुलै रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार, संघटक दुर्गेश तोकला, महिला आघाडी प्रमुख करुणा जोशी, शहर प्रमुख तुषार येन्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना रियाज शेख म्हणाले की, शिवसेना पक्ष लोकहिताचे कार्य करणारा पक्ष असून शिवसेना पक्षाचे ध्येय-धोरणे, आचार-विचार प्रत्येक घराघरात पोहचविण्यासाठी शिवसैनिकांनी इमाने इतबारे कार्य करून ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हा उपक्रम प्रत्यक्षात कृतीतून दाखविण्यासाठी कामाला लागावे व पक्षाची मोट व नव्या फळीतील युवकांना पक्षात जोडून लोकहिताचे कार्य करावे व गांव कोरोनामुक्तीसाठी लसीकरणासाठी व अन्य अडी-अडचणीसाठी तत्पर राहावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी रियाज शेख यांनी केले.
याच दरम्यान विजय इंदलवार, राजू तोटावार, सुधीर सेनिगरपू, कल्याण चिंतला, सदाशिव सुदीला, सुरेश लेनगुरे, संतोष चिंतागिरी, जयक्रीष्ण संदिल, मनोज सुदीला, सडवली सुंदीला, गोपाल सुंदीला, राजबाबू सुंदीला, साईकिरण गड्डम, शेखर सुंदीला आदींनी शिवसेना पक्षात प्रवेश केले. रियाज शेख यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.