काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंचा भाजपात प्रवेश

काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंचा भाजपात प्रवेश

पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी शुक्रवार(29मार्च)ला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा  पक्षाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिशाहिन प्रदेश नेतृत्त्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. देवतळे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला आहे.

प्रकाश देवतळे म्हणाले, बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला काँग्रेसने विदर्भात एकही उमेदवारी दिलेली नाही. तेली समाज काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. पण त्याची प्रदेश अध्यक्षांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवतळे यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व आ बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत भाजपात नागपूर येथे प्रवेश केला.