बिरसा मुंडा उत्कृष्ठ ग्रामपंचायत योजना पेसा ग्रामपंचायतीनी जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन

बिरसा मुंडा उत्कृष्ठ ग्रामपंचायत योजना पेसा ग्रामपंचायतीनी जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.19:पेसा क्षेत्रातील गांवाचा सार्वगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातुन आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी विभागाच्या एकुण अर्थ संकल्पाच्या 5 टक्के निधीची तरतुद केली जाते व सदर निधि हा पेसा ग्रामपंचयातींना लोकसंख्येच्या प्रमाणात थेट वर्ग केला जातो. सदर निधीचा विनियोग हा ग्रामपंचायती मार्फत विविध विकास कामाकरीता केला जातो. या निधीचा सुयोग्य वापर ज्या ग्रामपंचायतीने केला आहे. अशा ग्रामपंचायतीना प्रोत्साहन म्हणुन सत्कार केल्यास त्यांच्यामध्ये स्पर्धेची भावना निर्माण होईल व गांवाचा विकास होईल याकरीता शासन निर्णय अन्वये “बिरसा मुंडा उत्कृष्ठ ग्रामपंचायत योजना” शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, दिनांक 18.06.2021 अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत पेसा ग्रामपंचातींना ग्राम विकास आराखडया बदल प्रशिक्षण देणे व त्याबाबत त्यांची क्षमता बांधणी करणे, पेसा ग्रामपंचायती कडुन आरोग्य, कुपोषण, शिक्षण, सामुहीक व्यवस्थापन, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान याबाबत करावयाच्या कामाचे आराखडे तयार करुन व त्यापैकी उत्कृष्ठ आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी देणे, आदर्श पेसा ग्रामपंचायती म्हणुन विकसीत करणेत आलेल्या ग्रामपंचायतींना आदर्श ठेवुन त्याच प्रमाणे इतर ग्रापंचायतींना लोकसहभागातुन विकसीत करण्याकरीता प्रोत्साहीत करणे हा योजनेचा उद्देश आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरीता जास्तीत जास्त अर्ज पेसा ग्रामपंचायतीनी गट विकास अधिकाऱ्यामार्फत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास गडचिरोली कार्यालयास सादर करण्याबाबत आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली डॉ. मैनक घोष, यांनी केलेले आहे.