गडचिरोली : अहेरी विधानसभेत शिवसंपर्क अभियानाला मुदतवाढ

अहेरी विधानसभेत शिवसंपर्क अभियानाला मुदतवाढ

राजकारण नव्हे, तर समाजकारणासाठी अभियान
रियाज शेख

सदाशिव माकडे
(गडचिरोली जिल्हा)

अहेरी :- शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, शिवसेना पक्षाच्या वतीने गावे कोरोनामुक्ती करण्यासाठी व गावकरी आणि नागरिकांचे समस्या जाणून घेण्यासाठी व पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी गत १२ जुलै ते २४ जुलै पर्यंत राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे संकल्प करून शिवसेना जिल्हा प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावून तशा सूचना केले.
पण अहेरी विधानसभा क्षेत्र क्षेत्रफळाने, विस्ताराने व भौगोलिक दृष्ट्या राज्यात सर्वाधिक मोठा असल्याने अहेरी विधानसभेचे शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांना सदर बाब लक्षात आणून दिल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठांनी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील शिवसंपर्क अभियान ०१ आगष्ट पर्यंत मुदतवाढ करून दिले. त्यामुळे जिल्हा प्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे आभार मानून आनंद व्यक्त केले आहे.
रियाज शेख हे सबंध सिरोंचा तालुका दोन टप्प्यात पिंजून काढले असून आता उर्वरित एटापल्ली, भामरागड, मूलचेरा व अहेरी तालुक्यात शिवसंपर्क अभियान तेजीत राबविणार आहे.
रियाज शेख यांच्याकडे शिवसंपर्क अभियानादरम्यान निवेदनाचा पाऊस पडला असून निवेदनातील प्रमुख व मुख्य समस्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याकडे पोहचवून समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून क्षेत्र दुर्गम, जंगलव्याप्त, आदिवासीबहुल असल्याने लवकरच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या पुढाकारातून राज्याचे नगरविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे व पक्षाचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेतेमंडळीची खास बैठक लावणार असल्याचे मानस रियाज शेख यांनी बोलून दाखविले.
राजकारण नव्हे, तर समाजकारणासाठी अभियान अभियान असल्याचे बैठकीत बोलत होते, शिवसंपर्क अभियानाचा हेतू राजकारण करण्यासाठी नव्हे तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सामाजिक धडपड व तळमळ असल्याने राज्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांचे समस्या व प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असल्याचे रियाज शेख यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून कोरोना प्रतिबंधक लस, गावातील समस्या व त्यावरील उपाय शोधण्यासाठी तथा समस्या कायमस्वरूपी मार्गी लावून सोबतच शिवसेना पक्ष हे सत्तेत असले तरी, नाळ मात्र ‘ग्राउंड लेव्हल’च्या लोकांशी घट्टपणे जुळून राहण्यासाठीच शिवसंपर्क अभियान राबविल्या जात असल्याचे व त्याचे फलीत सुद्धा दिसत असल्याचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी म्हटले असून राज्यात एकमेव अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रासाठी शिवसंपर्क अभियानाची मुदतवाढ मिळाल्याने शिवसेनेचे प्रत्येक तालुका प्रमुखांनी व पदाधिकाऱ्यांनी येत्या ०१ आगष्ट पर्यंत अभियान राबवून सामाजिक दायित्व दाखवून देण्याचे आवाहनही केले आहे.