चंद्रपूर : वरोरा शहरात कारगिल विजय दिवस साजरा

वरोरा शहरात कारगिल विजय दिवस साजरा

बातमी संकलन प्रकाश देवारकर

वरोरा
एअरबॉर्न ट्रेंनिग सेंटर ,मार्शल आर्ट ट्रेंनिग सेंटर वरोरा व भारतीय माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा शहरामध्ये प्रथमच 26 जुलै 2021 ला शहिद योगेश डाहूले चौकातील हुतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरवातीला सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान शहरातून भव्य -दिव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये 300 विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाची विशेषतः एन सी सी कॅडेट मार्फत राईट परेड करून हुतात्मा स्मारकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर,कॅप्टन निंब्रड सर,माजी सैनिक व वरोरा शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते रमेशजी राजूरकर, माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा ऍड.मोरेश्वरराव टेमुर्डे ,नगरसेविका सुनिताताई काकडे,छोटू भाऊ,माजी नगरसेवक विलासभाऊ नेरकर,शहिद योगेश डाहूले यांचे वडील वसंतराव डाहूले,आणि त्यांच्या मातोश्री यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये कारगिल योद्धा म्हणून दहा माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.त्यासोबतच कोविड मध्ये उल्लेखनिय कार्य करणारे असे जवळपास 10 सामाजिक संघटना,आणि डॉक्टर ,नगरपरीषदचे अधिकारी या सर्वांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला विशेष रूपाने नागपूर-चंद्रपूर विभागातून चाळीस माजी सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एअरबॉर्न ट्रेंनिग सेंटरचे आणि मार्शल आर्ट ट्रेंनिग सेंटरचे माजी सैनिक सागर कोहळे,प्रवीण चिमुरकर,रवी तुरानकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत मारोडकर,व रवी चरूरकर आणि सामाजिक संघटनांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन विनोद उमरे,यांनी तर प्रास्ताविक व आभार माजी सैनिक खापणे सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या भाषणातून कारगिल विजय दिवसाचे कौतुक तर केलेच परंतु सर्वधर्म आणि सर्व सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमामध्ये सामावून घेतले व हा कार्यक्रम निरंतर समोर सुरू राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या आणि मदतीचा हात सुद्धा समोर केला.