आदिवासी मुलांकरीता वैज्ञानिक गो आधारे 7 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

आदिवासी मुलांकरीता वैज्ञानिक गो आधारे 7 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

चंद्रपूर दि. 7 जुलै : श्री. शांतिनाथ सेवा संस्थान, जैन तीर्थ, 257 नवरंग बाग, घुलेवाडी, संगमनेर या संस्थेमार्फत आदिवासी मुलांकरीता वैज्ञानिक गो आधारे 7 दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

या शिबिराअंतर्गत 18 ते 30 वर्ष वयोगटातील आदिवासी मुलांना गो आधारित शेती, सेंद्रिय खत उत्पादन, भाजीपाला रोपवाटिका, नर्सरी व्यवस्थापन, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय, चारा उत्पादन व चारा प्रक्रिया, दूध प्रक्रिया व दूध उत्पादने, महिलांसाठी हिरव्या पालेभाज्या प्रक्रिया, फळ प्रक्रिया आदी अभ्यासक्रमांना आदिवासी मुलांना संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिर दरम्यान 7 दिवसासाठी राहण्याची व जेवणाची सोय सदर संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

तरी, चिमूर प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या, चिमूर, वरोरा ,भद्रावती, नागभीड व ब्रह्मपुरी या पाच तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. सदर प्रशिक्षणासंबंधी अधिक माहिती व संपर्क करिता श्री. शांतिनाथ सेवा संस्थान, जैन तीर्थ, 257 नवरंग बाग, घुलेवाडी, संगमनेर या संस्थेचे ट्रस्टी राजेंद्र सांबरे 9922711124, नरेंद्र परमार 9371107439 तसेच मॅनेजर संतोष काळे 7720806090 यांच्याशी संपर्क साधावा, असे चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के. ई.बावनकर यांनी कळविले आहे.