बामनी बल्लारपुर राजुरा रोड अपघात दोन गंभीर, एक जखमी

बामनी बल्लारपुर राजुरा रोड अपघात दोन गंभीर, एक जखमी

बातमी संकलन -शंकर महाकाली
बल्लारपूर बामनी  ते राजुरा रोडने कंटेनर जात असताना रस्त्यातील एका मोठ्या खड्ड्यात चाक गेल्याने चालकाचे वाहनावरून संतुलन बिघडल्याने एका अल्टो कारला धडक दिली. त्यातील व्यक्ती चंद्रपूर असुन गंभीर जखमी झाले आहेत. याच अपघातात मारोती स्विफ्ट डिझायर सुध्दा अल्टो  ला धडक दिल्याने त्यात एक महीला सुद्धा  किरकोळ जखमी झाली आहे.
वास्तविक पाहता हा अपघात सार्वजनीक बांधकाम विभाग च्या दुर्लक्षतेमुळे झाला असावा. कारण चंद्रपूर जिल्ह्यात अनेक रस्ते नादुरुस्त आहेत त्यामुळे वाहन चालवताना चालकांना बराच त्रास सहन करावा लागतो आहे.
बऱ्याच ठिकाणी नविन रस्ते व पुलाचे काम सुरू आहेत पन पर्यायी रस्ता सुध्दा व्यवस्थीत नसल्याने अपघाताला आमंत्रण देत आहेत.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिस घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
पुढील तपास  उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे  मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलानी करीत आहेत.