नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते हायमास चे उदघाटन

नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते हायमास चे उदघाटन

प्रभाग ०६ महाराणा प्रताप वॉर्ड व दादाभाई नौरोजी वॉर्ड,बल्लारपुर अचानक प्रकट हनुमान मंदिर येथे भाजपा जेस्ट नेते चंदनसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनात नगरसेविका,जयश्री किशोर मोहूर्ले यांच्या मागणीची पूर्तता होत नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते हायमासचे उदघाटन पार पडले.या प्रसंगी भाजप शहराचे अध्यक्ष काशीनाथ सिंग,महामंत्री मनीष पांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अचानक प्रकट हनुमान मंदिराचे पदाधिकारी नरेश डोंगरे,रवी पोतर्लावार,गोपाल मोहूर्ले, सुरेश हजारे यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या उदघाटन प्रसंगी श्रीमती भुते काकू, निर्मला परिहार, शशिकला बघेल, सारिका टेम्भुरणे, पुष्प्पा आस्वले यांना मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सम्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात संजय रामटेके,संजय वाजपयी, राहूल येवले,हरेराम काका,लोहबडे,पुलगमवार,उईके,बंडे, निवलकर,तावाडे,मनिराम,
पतीराम आदी वॉर्डातील जेस्ट नागरिक व महिला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांच्या नेतृत्वात करण्यात आले तर सूत्र संचालय सामाजिक कार्यकर्ता किशोर मोहूर्ले यांनी केले.