chandrapur I चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया निवडणुकीला आव्हान.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया निवडणुकीला आव्हान.

नागपूर- चिमूरचे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. धनराज मुंगळे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

 
 
याचिकाकर्त्याच्या मते, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर मतदारसंघातून भांगडिया निवडून आले. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. ईव्हीएम मशीनच्या वापराची प्रामाणिकता अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. शिवाय निवडणुकीदरम्यान व्हीव्हीपॅट मशीनच्या पावत्या तपासण्यासाठी अर्ज केला असता निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली नाही. या निवडणुकीत मोठी अनियमितता झाली असाही दावा या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.