साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साकीनाका येथील महिलेवर झालेला निर्घृण बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक.
एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करा – मुख्यमंत्री
उद्यापासून तातडीने विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश.
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करावी. शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करुन तिथे वेळोवेळी भेटी द्याव्यात. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवावी– मुख्यमंत्री