sindewahi l केंद्र सरकारच्या भाववाढीच्या निषेधार्थ आंदोलन करून दिले निवेदन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारने लॉकडाऊन नंतर २० वेळा पेट्रोल व डिझेल दरवाढ केली. तसेच घरगुती गॅस सिलेंडर च्या दरात जी भरमसाठ वाढ होत आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर शिवसेनेने आंदोलन करून निवेदन दिने सुरू आहे. त्यांच अनुषंगाने आज शिवसेना तालुका शाखा सिंदेवाही यांच्या सुद्धा केंद्रातील भाजपा सरकार च्या विरोधात निदर्शने देऊन निवेदन देण्यात आले.

पेट्रोल व डिझेल महागल्यामुळे आज सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला वाढला आहे.
ज्या घोषणांचा पाऊस करत मोदी सरकार सत्तेवर आले त्याच घोषणा आज पोकळ ठरत असून दिवसेंदिवस महागाई ही कमी न होता वाढ आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब कुटुंबाचे हाल होत असून पुन्हा परिस्थिती बिकट होत चालली आहे. करिता केंद्र सरकारने पेट्रोल , डिझेल ची तसेच घरगुरी गॅस सिलेंडर ची दरवाढ कमी करावी यासाठी आज शिवसेना तालुका सिंदेवाही यांच्या वतीने तहसीलदार सिंदेवाही यांच्या मार्फतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी शिष्टमंडळात आशिष चिंतलवार, शिवसेना तालुकाप्रमुख देवेद्र मंडलवार , माजी शहरप्रमुख विकास आदे , उपशहरप्रमुख विशाल लोखंडे , युवासेना शहरप्रमुख सागर बोरकर ,शिवसेना उपतालुकाप्रमुख महेष गेडाम, ग्रा. प.सदस्य टेकरी दुर्वास मंडलवार , शाखाप्रमुख कचेपार आशिष सरपाते, गणेश बोंमावार , रवि भरडकर , ललीत गुज्जेवार , सुमित कटकमवार , घनश्याम बोरकर , महेश कावळे , रितिक मारशेट्टीवार , कार्तिक बोरकर , अक्षय भरडकर , मोरेश्वर लोखंडे तसेच अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.