सिंदेवाही पोलीसांची मोठी कामगिरी ; मध्यप्रदेश येथील महिला चोरांची टोळी केली जेरबंद

 

दिनांक :- ०४/०२/२०२१

सिंदेवाही आज रोजी १२.३० वा. चे दरम्यान अभिमन्यू सोमाजी कोटनाके .वय ६२ वर्ष रा.पवना चक ,तालुका सिंदेवाही यांनी बँक ऑफ इंडिया सिंदेवाही येथून शेतीसाठी पिक कर्ज म्हणून ५०,००० हजार रुपये. रोख रक्कम विड्राल केले व बँकेच्या बाहेर निघाले.
बँकेच्या समोरील चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी थांबले होते. बँकेतुन बाहेर निघतांना हातात पैशाची बॅग आहे अशी पक्की खात्री झाल्याने त्यांच्या बाजुला दोन महिला येवुन उभे झालीत यांनी काहीतरी खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातातील थैलीला ब्लेडने चिरा मारून त्यातील पन्नास हजार रुपये चोरून घटनास्थळावरून पळ काढला. फिर्यादी अभिमन्यू यांच्या सदरची बाब लगेच लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला.
बँक परिसर, शिवाजी चौक येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी यांचे सदरचे बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलिस स्टेशन ला माहीती देत महिलाचा पाठलाग करून त्यांना थांबविले. महिला पोलीसांनी त्यांचे करवी तपासणी केली असता सदर महिलांचे कमरेमध्ये लपवून असलेले रोख रुपये पन्नास हजार रुपये मिळून आले. आरोपी – रंजना बिरू सिसोदिया वय १९ वर्ष ,राखी बिरू सिसोदिया वय ४० वर्षे रा. कडीया , जिल्हा राजगड, मध्य प्रदेश. दोनही आरोपी महिला यांना अटक करून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुन्हा नोंद केला आहे.
आरोपी महिला मध्य प्रदेश येथील राहणाऱ्या असून तेथील पोलिसांची संपर्क साधला असता सदर महिला या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे माहिती प्राप्त झालेली आहे.
पोलीस निरीक्षक योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवणे करीत आहेत.