chandrapur I सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील तसेच सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.

शाळा आणि महाविद्यालये –

सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. वरील नियमामधून १० वी आणि १२ वीच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट असेल. परिक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा ४८ तासापर्यत वैध असलेले कोरोनाचे निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून चंद्रपूर

जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊ न देता, स्थानिक आपत्ती प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन परिक्षा घेता येतील. सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. भारत सरकारकडील निर्देशानुसार वरील नमूद आस्थापनामधील शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -१९ विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व शाळा महाविद्यालये आणि कोंचिग क्लासेस सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.