गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

चिकणी येथील घटना

शिरीष उगे (प्रतिनिधी वरोरा):
तालुक्यातील चिकणी येथील मृतक युवक गावातील शेतकरी श्रीधर मानकर यांचे शेतात जाऊन शेतातील बंड्याचे अँगल ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही.
मृतक युवकाचे नाव गणेश गोविंदा नक्षीने वय 23 रा.चिकणी,ता.वरोरा असे आहे.सदर घटना 27 ऑक्टोम्बर ला रात्रौ दरम्यान घडली.ज्या शेतात युवकाने गळफास घेतला.त्या शेतकऱ्यांचा नोकर 28 ला सकाळी कामासाठी शेतात गेला तर घटना उघडकीस आली.मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे करण्यात आले.
मृतकाचे मागे आई-वडील ,भाऊ असा बराच आप्तपरिवार आहे.