सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढ लाभार्थींची संख्या वाढणार याचा आनंद – धनंजय मुंडे

सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढ लाभार्थींची संख्या वाढणार याचा आनंद – धनंजय मुंडे

          मुंबई, दि. 8 : 28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असूनराज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

 

            या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी 500 कोटी होतेते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून वाढवून एक हजार कोटीसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून दहा पटीने वाढवून 500 कोटी करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असूनत्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आहेत.