चामोर्शी बस स्थानक बांधकामाचा दूरचित्रफीत व्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

चामोर्शी बस स्थानक बांधकामाचा दूरचित्रफीत व्दारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हस्ते भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न

चामोर्शी बसस्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत कुदळ मारुन संपन्न झाला

सामान्य जनतेने सुरक्षिततेसाठी लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी ( बस सेवा ) हीच सुरक्षितता – खासदार अशोकजी नेते

चामोर्शी येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ,गडचिरोली विभाग गडचिरोली व्दारे गडचिरोली विभागातील चामोर्शी बसस्थानक बांधकामाचा

दूरचित्रफीत व्दारे भव्य भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा, ना, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तालुक्यातील बस स्थानकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला,* *या निमित्याने आज चामोर्शी शहरातील बस स्थानकाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते,गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी,मार्ग विभाग नियंत्रक स्मिता* *सुतवने ,नायब तहसिलदार वैद्य साहेब , एस्टी चे अभियंता मोडक , प्रकाश भाऊ गेडाम , अनुसूचीत जमाती प्रदेश महामंत्री,भाजपा प्रदेश युवा मोर्चा सदस्य स्वप्नील भाऊ वरघंटे नगरपंचायत चामोर्षी शहराचे नगराध्यक्ष सौ, जयश्री ताई* *वायलालवार , नगर उपाध्यक्ष* *चंद्रकांत बुरांडे माजी, सभापति रमेश भाऊ बारसागडे,*

*भा, ता, अ,दिलीप* *चलाख ,तालुका महामंत्री ,विनोद गौरकर,साईनाथ बुरांडे ,भाजपा पदाधिकारी भास्कर बुरे,शेषराव कोहळे, जयराम चलाख ,*

*व पदाधिकारी उपस्थित होते*

*उपस्थितांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी ,प्रकाश भाऊ गेडाम ,विभाग नियंत्रक स्मिता सुतवने ,भाजपा ता, अ दिलीप चलाख यांनी मार्गदर्शन केले*

*यावेळी प्रामुख्याने खासदार अशोक भाऊ नेते यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले सामान्य जनतेने सुरक्षितते साठी लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी ( बस सेवा) हीच सुरक्षितता आहे असे प्रतिपादन केले व तालुक्याच्या विकासात्मक विविध मुद्दे सांगितले व गडचिरोली विधानसभेचे आमदार असतांना खासदार अशोकजी नेते यांनी केलेले अनेक महत्वाच्या विकासात्मक मुद्द्यावर लक्ष वेधले यावेळी प्रामुख्याने तालुक्यातील भाजपा पदाधिकारी गावातील नागरिक बंधू भगिनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…… कार्यक्रमाचा यशस्वी करण्यासाठी एस्टी महामंडळ पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले