संविधान चौकातील बुद्धविहारात नगराध्यक्षांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

संजीव बडोले,प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. 27 ऑक्टोंबर:-
अर्जुनीमोरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत गणेश नगर च्या संविधान चौकातील बुद्ध विहारात सभामंडपाचे भूमिपूजन नगराध्यक्ष किशोर शहारे यांच्या हस्ते नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांच्या उपस्थितीत पार पडले.
विजयादशमीचे औचित्य साधून हा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन, माल्यार्पण आणि दीप प्रज्वलनाने झाली. माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्थानिक विकास निधीतून संविधान चौक येथील बुद्धविहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत हे सभामंडप मंजूर करण्यात आले होते.भूमिपूजन सोहळ्याला डॉ.भारत लाडे, माजी सरपंच कांता पाऊलझगडे,नाना शहारे, नगरसेविका वंदना जांभुळकर, पुनाराम जगझापे,नेहरू चव्हाण, जयश्री खोबरागडे, बादशहा लाडे, युवराज जांभुळकर,टिकाराम शहारे, पवन वाल्दे, अंकीत शुक्ला, दिलीप लाडे उपस्थित होते.